धक्कादायक : आलापल्लीत बैलपोळ्याच्या दिवशीच गोहत्या

260

– आरोपी फरार, दोन दुचाकी जप्त
The गडविश्व
शीतल कुंभारे / एटापल्ली,  २९ ऑगस्ट : एकीकडे संपूर्ण भारत देश बैलपोळा सण उत्साहात साजरा करत असताना दुसरीकडे त्याच देशांमध्ये पवित्रदिनी गाय बैलांची हत्या करत असल्याची धक्कादायक घटना आलापल्ली येथे बैलपोळा सणाच्या दिवशी समोर आली.
२७ ऑगस्टच्या मध्यरात्री दोन वाजता टायगर ग्रुपला आलापल्ली पासून पाच किलोमीटरवर जंगलात काही अज्ञात व्यक्ती गायींची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी तात्काळ जंगलाचे दिशने घटनास्थळाकडे जाण्यास निघाले. दरम्यान काही अंतरावर गेल्यावर त्या जंगल परिसरात बॅटरीचा प्रकाश दिसायला लागलाअसता सर्व सदस्य सतर्क झाले व त्या प्रकाशाचा दिशने हळूहळू चालायला लागले. यावेळी गौ हत्या करणाऱ्या आरोपींना यांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळी दोन दुचाकी व गायीचे मास आढळून आले.सदर घटने विषयी अहेरी पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. घटनस्थवरील दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या असून या घटनेचे अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे.
मात्र सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेसंदर्भात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान टायगर ग्रुपच्या सातर्कतेने आरोपींचा हा डाव उधळून लावण्यात आला असून. अशाप्रकारच्या घटनेसंदसर्भात माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here