– गडचिरोली पं.स. अंतर्गत सरपंच व सचिव यांचा सन्मान
The गडविश्व
गडचिरोली, २९ ऑगस्ट : स्थानिक पंचायत समिती मध्ये आमदार डॉ.देवराव होळी यांचे हस्ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वराज्य महोत्सव चे औचीत्य साधुन हर घर तिरंगा उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी करण्याऱ्या ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांचा आज २९ ऑगस्ट रोजी प्रशस्ती पत्र देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
सदर सत्कार सोहळा व कार्यशाळेकरीता आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली माजी सभापती मारोतरावजी इचोडकर, माजी उपसभापती विलासरावजी दशमुखे, गट विकास अधिकारी धनंजय साळवे, गटशिक्षणाधिकारी परसा, कृषी अधिकारी पी.पी.पदा, के. जी. बोपणवार, विस्तार अधिकारी अमोल भोयर, पंचायत समिती, गडचिरोली, रामरतनजी गोहणे, कार्यालयीन सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग, सचिव, सरपंच, नागरीक, महिला इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन दिभना ग्रामपंचायत सचिव कु. वासंती देशमुख यांनी केले. प्रास्तावीक गट विकास अधिकारी पं.स. गडचिरोली धनंजय साळवे तर आभार विस्तार अधिकारी (पं) के.जी. बोपणवार यांनी मानले. कु. पातकमवार मॅडम, अधिक्षक, प्रदिप बरई, समन्वयक पाणी व स्वच्छता, राहुल दिवटे, रुपेश पेंटलवार, पेसा समन्वय इ. नी आयोजनार्थ भुमीका बजावली. माजी सभापती इचोडकर यांनी ” जय जय महाराष्ट्र माझा ” या गिताच्या माध्यमाने देशभक्तीची भावना प्रजल्वीत केली. आमदार डॉ. देवराव होळी यांनी सर्व सरपंच, सचिव व कर्मचारी यांना देशहित गाव विकासाच्या माध्यमातुन विविध योजनांवर व नागरीकांच्या हितार्थ कर्तव्य पार पाडणे विषयी मार्गदर्शन केले.