पं स. गडचिरोली येथे नागरी हक्क संरक्षण अधिनीयम १९८९ अंतर्गत अंमलबजावणी (प्रचार व प्रसार) मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

279

The गडविश्व
गडचिरोली, २९ ऑगस्ट : स्थानिक पंचायत समिती येथे नागरी हक्क संरक्षण अधिनीयम १९८९ अंतर्गत प्रचार व प्रसार, अंमलबजावणी करीता आज २९ ऑगस्ट रोजी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन विभागीय अध्यक्ष, बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ डॉ. नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे यांनी केले.
कार्यशाळे दरम्यान नागरी हक्क सरंक्षण अधिनीयम १९८९ अंतर्गत अंमलबजावणी अधिनीयमाचे महत्व त्याचे उददेश व प्रामुख्याने या मध्ये सरपंच, सचिव व कर्मचारी यांची प्रमुख भुमीका स्पष्ट करण्यात आली. व त्याचे महत्व पटवुन सांगण्यात आले. सदर कार्यशाळा गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सरपंच व सचिव तसेच कार्यालयीन कर्मचारी प्रशिक्षणार्थी म्हणुन प्रामुख्याने हजर होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक वि.अ.पंचायत के. जी. बोपणवार, संचालन वि. अ. पंचायत अमोल भोयर यांनी केले. प्रदिप बरई, समन्वयक पाणी व स्वच्छता रुपेश पेंटलवार पेसा समन्वय यांनी आयोजनार्थ भुमीका बजावली. नागरी हक्क अधिनीयम १९८९ ची प्रभावी अंमलबजावणी व जनहितार्थ कामे करण्याचे निर्देश गट विकास अधिकारी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here