जुन्याचा योजना नव्याने रेटून सांगणारा अर्थसंकल्प ; युवक, महिला, शेतकरी यांची दिशाभूल : खासदार डॉ. नामदेव किरसान

118

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प जुन्याच योजना नव्याने सांगण्याचा कार्यक्रम होता, या बजेट मधून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचा काम करण्यात आला आहे. शेतकरी, महिला, युवक यांचा भ्रमनिरास झाला आहे. मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असताना महागाई कमी करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही, लोकांची इन्कम कशी वाढेल याचा उल्लेख नाही, मात्र इन्कम न वाढवता फक्त इन्कम मध्ये सूट देऊ असे दाखवून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यात आली. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्याची आय दुप्पट करण्याचे सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिले, मात्र आता किमान आधारभू किमंत (MSP) वाढवण्यासाठी कुठलेही धोरण नाही, विमा कंपन्या मध्ये परदेशी कंपन्याना सरळ प्रवेश देण्यात (FDI ) येणार आहे, त्यामुळे LIC सारख्या शासकीय कंपन्या कमजोर होईल व विमा कंपन्यात खाजगीकरण वाढून बेरोजगारिचेही प्रमाण वाढणार आहे, शासनाने युवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणले मात्र प्रशिक्षण नंत्तर त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल अश्या कुठल्याही प्रभावी योजना या बजेट मधून दिसून आल्या नाही.अशी प्रतिक्रिया गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here