-अहेरी पोलिस व मुक्तीपथची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : अहेरी तालुक्यातील व्यंकटपरावपेठा येथील एका दारू विक्रेत्याच्या घरातून जवळपास 10 हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करून गुन्हा दाखल केल्याची कारवाई अहेरी पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
व्यंकटपरावपेठा येथील अवैध दारूविक्री बंदीसाठी गाव संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. विविध उपक्रम राबवून लोकांना जागृत केले जात आहे . मात्र , गावातील काही मुजोर दारू विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. सध्यास्थितीत गावात जवळपास 4 ते 5 दारूविक्रेते असून ग्रामस्थांना अवैध दारूविक्रीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, एक विक्रेता चोरट्या मार्गाने घरातून दारूविक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे अहेरी पोलीसांनी संबंधित विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून जवळपास 10 हजार रुपये किमतीची देशी- विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस.आय मोरे व त्यांच्या पथकाने केली. यावेळी मुक्तीपथ तालुका चमू उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )