तळोधी मोकासा येथील होलसेल विक्रेत्यावर गुन्हा दाखल

172

-१५ हजाराची देशी दारू जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : चामोर्शी तालुक्यातील तळोधी मोकासा या गावाला अवैध दारूविक्रीमुक्त करण्यासाठी महिलांनी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे मागील तीन महिने गावातून अवैध दारू हद्दपार झाली होती. परंतु, गावातील काही विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरु केल्याची माहिती मिळताच मुक्तिपथ व गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत एक होलसेल दारू विक्रेत्याकडून १५ हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करून संबंधित विक्रेत्यास पोलिसांच्या स्वाधीन केले.
हे गाव मुख्यालयापासून १० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी १५ ते २० दारू विक्रेते सर्रास दारू विक्री करीत होते. अवैध दारूविक्रीला कंटाळून महिलांनी ग्रामसभा घेऊन दारूविक्रीबंदीचा ठराव पारित केला. तसेच सर्व दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याची तंबी देण्यात आली. यामुळे काही दारू विक्रेत्यांनी दारूविक्री बंद केली. परंतु काही मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे गाव संघटनेने सात दारूविक्रेत्यांना पडकून पोलिसांच्या स्वाधीन केले. तरी काही विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. यासंदर्भातील माहिती पोलिस अधीक्षक यांना निवेदनातून देण्यात आली असता संबंधित विक्रेत्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली. यामुळे सदर गाव गेल्या तीन महिन्यांपासून अवैध दारूविक्रीमुक्त झाला होता.
अशातच गावातील होलसेल विक्रेते चोरट्या मार्गाने दारूविक्री करीत होते. ही बाब लक्षात येताच मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी दारू विक्रेत्यांवर योग्य वेळीच कारवाई न केल्यास सर्व विक्रेते पुन्हा आपला अवैध व्यवसाय सुरु करण्याची शक्यता असल्याची बाब पटवून दिली. दरम्यान, गावातील महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार १८ जून रोजी गाव संघटना व मुक्तिपथने संयुक्त कृती करीत अनिल भुरसे या विक्रेत्याकडून अंदाजे १५ हजार रुपयाचे देशी टिल्लू पकडून गुन्हा दाखल करण्यात आला. इतर दारूविक्रेत्यांच्या घर परिसराची तपासणी केली असता, इतर विक्रेत्यांकडे मुद्देमाल मिळाला नाही. संबंधित विक्रेत्यांना अवैध व्यवसाय बंद करण्याची सूचना करण्यात आली. यावेळी -पोलिस विभागाचे कर्मचारी, मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद सिडाम, विनोद पांडे, स्पार्क कार्यकर्ती पल्लवी चौधरी, गाव संघटनेचे रेखा कुनघाडकर, ललिता मेश्राम, संगीता भोयर, सरूबाई कुनघाडकर, उष्टाबाई किरमे, मीराबाई किरमे, मायबाई भोयर., मीराबाई टिंगूसले, ज्ञानेश्वरी बुरांडे, शोभा गेडाम, पुष्पाबाई मेकलवार, लक्ष्मी शेरकी. मंगला गेडाम, निळा मेकलवार. काजल चिचघरे, विमल गेडाम, सखुबाई कुकडकार, अनुसया शेंडे, ममता मेश्राम, मीनाश्री भोयर, शब्बूबाई गणवीर, विमल वासेकर उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #serchhospital #serchchatgao )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here