कुरखेडा येथे तलवारीने केक कापणा­ऱ्या चार तरुणांवर गुन्हा दाखल

2152

– तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे पडले महागात
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०८ : शहरातील गोठणगाव नाक्याजवळ ३० नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रोच्या सुमारास काही तरुणांनी एकत्र येवुन गोंधळ/आरडाओरड करुन अवैधरित्या तलवार बाळगुन त्या तलवारीने केक कापल्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
तौसिफ रफीक शेख (वय ३६), अशफाक गौहर शेख ( वय ३५), परवेज फिरोज पठाण (वय २५), शाहरूख नसिम पठाण (वय २५) वर्षे रा. राणाप्रताप वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा जि. गडचिरोली अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. या चौघांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध व व्हिडीओमधील इतर सर्व आरोपीतांविरुध्द कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा १९५९, सहकलम ३७(१) (३), १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील सर्व शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमीच गस्त केल्या जाते. रात्रीच्या वेळी देखील नागरीकांच्या सुरक्षिततेकरीता पोलीस दलाकडुन रात्रगस्त केल्या जाते. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यात २७ नोव्हेंबर २०२४ चे ००.०१ वाजता पासून ते ११ डिसेंबर २०२४ चे रात्रो २४.०० वा. पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. असा आदेश असतांना देखील ३० नोव्हेंबर २०२४ चे रात्री १२.०० वा दरम्यान पोस्टे कुरखेडा हद्दीतील गोठणगाव नाक्याजवळ काही तरुणांनी एकत्र येवुन गोंधळ/आरडाओरड करुन अवैधरित्या तलवार बाळगुन त्या तलवारीने केक कापला असल्याबाबतची गोपनिय माहिती कुरखेडा पोलीसांना मिळाली. त्या अनुषंगाने अधिकची चौकशी केली असता, सोशल मिडीयावरील व्हिडीओमध्ये सदर तरुण तलवारीचा वापर करुन केक कापत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तरुणांनी केलेल्या कायद्याच्या उल्लंघनामुळे तसेच सदर शस्त्राचा वापर करुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडुन येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीसांनी तलवारीसहित सदर तरुणांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर पोस्टे कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कार्यवाही मध्ये एक धारदार टोकदार तलवार अंदाचे किंमत १५ हजार रुपये जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयातील चौघे आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध व व्हिडीओमधील इतर सर्व आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्राची कायदेशिर कार्यवाही पोस्टे कुरखेडा येथील मपोउपनि. वर्षा बोरसे ह्या करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्रेणिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कुरखेडा प्रभारी अधिकारी पोनि. महेंद्र वाघ, मपोउपनि. वर्षा बोरसे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here