– गाव संघटनेचा पुढाकार ; गडचिरोली पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, २५ फेब्रुवारी : तालुक्यातील दिभना व बोदली येथील दारूविक्रेत्यांकडून गडचिरोली पोलिसांनी दारू जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दिभना गावाने दारुबंदिचा निर्णय घेऊन दारू विक्रीमुक्त गाव निर्माण करण्यासाठी गाव संघटन ,ग्राप समिती, तंटामुक्त समिती नियमित प्रयत्नशिल आहे. दारु विक्रेत्याना वारंवार सुचना करुनही विक्रेते चोरट्या मार्गाने विक्री करीत होते. दरम्यान, मुक्तिपथ गाव संघटना व ग्रामपंचायत समिती, तंटामुक्ती समितीने संयुक्तरीत्या वासुदेव मेश्राम या दारूविक्रेत्याकडून १० हजार ५०० रुपयांची १५० देशी टिल्लु दारू जप्त केली. याबतची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला.
बोदली येथे मुक्तिपथ गाव संघटना, ग्रामपंचायत समिती व तंटामुक्ती समितीने सयुक्तरित्या लपुन दारु विक्री करीत असलेल्या मदन जराते याच्याकडून ५ लिटर मोहफुलाची दारु पकडून पोलिस विभागाच्या स्वाधीन केले. दोन्ही कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली धनराज चौधरी ,भैसारे , सुजाता ढोबरे यांनी केली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर ,रेवनाथ मेश्राम, स्वीटी आकरे उपस्थित होते.
ताडी व सिंधी विक्रेत्यावर गुन्हा दाखल
मौशिचक येथे मुक्तिपथ व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करीत रासायनीक पावडर मिश्रित ताडी व सिंधी विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या गडचिरोली तालुक्यातील बहुतेक गावात तेलंगानातुन आलेले काही लोक ताडी बनवुन विक्री करीत आहेत. सदर विक्रेते पावडर टाकुन बनविलेली ताडी नसेसाठी वापर करित आहेत. यामुळे व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. मौशिचक येथे सिंधी विक्री करणाऱ्याकडून ४० लिटर सिंधी पकडुन पोलिस कार्यवाही करण्यात आली. सतय्या येलय्या आयातागानी रा.अकाराम, ता.जि नालगोंडा आंध्रप्रदेश असे आरोपीचे नाव आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (Vinay Gowda) (National Commission for Scheduled Tribes) (Maharashtra DGP Rajnish Seth) (Municipal Corporation of Delhi) (Women’s World Cup) (Sergio Ramos) (The Gdv)