The गडविश्व
गडचिरोली, १९ मार्च : देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील महिला दारूविक्रेत्याकडून ७१ देशी दारुचे टिल्लू जप्त करून देसाईगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुरुड या गावामध्ये एक महिला चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंज पोलिस, मुक्तीपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्तरित्या घराची तपासणी केली. यावेळी सदर दारूविक्रेत्याकडे ७१ रॅकेट कंपणीचे टिल्लू आढळुल आले. संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी गाव संघटनेचे अध्यक्ष उर्मिला मेश्राम, सदस्य गीताबाई शेंडे आणि गावचे सरपंच प्रशाला गेडाम, मुक्तीपथ टीम आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nottm Forest vs Newcastle) (Lance Reddick) (F1) (OPPO N2 Flip) (IND vs AUS) (Australia vs India)