-८२ लिटर मोहफुलाची दारू जप्त
The गडविश्व
गडचिरोली, १८ सप्टेंबर : तालुक्यातील अलोनी (मेंढा) येथील विक्रेत्यांकडून जवळपास ८२ लिटर मोहफुलाची दारू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तपणे केली.याप्रकरणी तीन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलोणी गावात मोठ्या प्रमाणात मोहा फुलाचा दारु काढली जाते. दारू विक्रीसाठी हे गाव कुप्रसिद्ध आहे. या गावात बोदली, मेंढा, गडचिरोली, विश्रामपुर या गावातील शौकीन दारू पिण्यासाठी येतात .अशातच गाव संघटन यांचे गुप्त माहितीचे आधारे मुक्तीपथ व पोलीस यांनी संयुक्त कार्यवाही करीत आलोनी येथील एकनाथ वड्डे, खुशाल वाद्दे, सुर्यभान वडे याच्याकडून २४ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना.पो.शी धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, शंकर पूंघाठी , तुषार खोब्रागडे, मुक्तीपथ चमू रेवणाथ मेश्राम, अनुप नंदगीरवार , बुधाबई पोर्टे यांनी केली.