काटली येथील दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

124

– १ लाख ५४ हजार रुपयांची देशी दारू जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : तालुक्यातील काटली येथील दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून 1 लाख 54 हजार रुपये किमतीची 22 पेट्या देशी दारू जप्त केल्याची कृती गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने केली. याप्रकरणी दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालाजी बारसागडे, नरेश बारसागडे असे आरोपींचे नाव आहे.
गडचिरोली तालुक्यातील काटली येथे 5 ते 6 दारू विक्रेते आहेत. गावात देशी, विदेशी, मोहाची दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. या गावात नगरी, काटली , साखरा, वसा, वसाचेक येथील दारू पिणारे लोक येतात. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे. दारूचे व्यसनामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. अशातच गुप्त माहितीचे आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने दोन दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून तपासणी केली असता अंदाजे 1 लाख 54 हजार रुपये किमतीची 22 पेट्या देशी दारू मिळून आली. संपूर्ण मुद्देमाल जप्त करून लालाजी बारसागडे व नरेश बारसागडे या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय मडावी, पोलिस नाईक धनंजय चौधरी, पोलिस नाईक अविनाश लंजे, ऋषाली चव्हाण, तुषार खोब्रागडे यांनी केली. यावेळी मुक्तिपथ चे उपसंघटक रेवनाथ मेश्राम, मेघा गोवर्धन, बुधाबाई पोरटे उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here