तुमडी गावातील चार विक्रेत्यांवर एकाच दिवशी गुन्हा दाखल

188

– दारूमुक्त गाव करण्याचा महिलांनी उचलला विडा
The गडविश्व
गडचिरोली, ४ फेब्रुवारी : चामोर्शी तालुक्यातील तुमडी गावात मुक्तिपथ गाव संघटनेने अहिंसक कृती करीत एकाच दिवशी चार दारू विक्रेत्यांवर आष्टी पोलिसांच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला आहे. गावाला दारूमुक्त करण्याचा विडा गाव संघटनेच्या महिलांनी उचलला असून त्यादृष्टीने वाटचाल सुरु आहे.
तुमडी हे गाव चामोर्शी तालुका व मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येतो. या गावात अवैध दारूविक्री केली जाते. या गावाच्या माध्यमातून रामकृष्णपूर, ठाकूरनगर, घोट येथील किरकोळ दारूविक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी चामोर्शी व मुलचेरा मुक्तिपथ तालुका चमूने वेळोवेळी गावात भेट देऊन मुक्तिपथ गाव संघटना गठीत केली. या संघटनेच्या माध्यमातून गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विक्रेत्यांना तोंडी सूचना देण्यात आल्या. तरीही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्याने नोटीस देखील बजावण्यात आले. मात्र, अवैध दारूविक्री सुरूच होती.
दरम्यान, मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी चामोर्शी व मुलचेरा मुक्तिपथ तालुका चमूच्या मदतीने अहिंसक कृती करीत गावातील ६ विक्रेत्यांच्या परिसराची पाहणी केली असता, चार जणांकडे जवळपास ६० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. त्याचवेळी आष्टी पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तुमडी गाव गाठून पंचनामा केला व एकाच दिवशी चार विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे इतर गावातील दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. तसेच गाव संघटनेने पोलिस विभागाला निवेदन सादर करून अवैध दारूविक्रीमुक्त गाव निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. सदर कारवाई आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार चंद्रप्रकाश निमसरकार, पोलिस हवालदार संतोष बैलमारे, मुनेश रायसिडाम यांनी केली. यावेळी चामोर्शीचे मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे व मुलचेराचे तालुका संघटक रुपेश अंबादे यांच्यासह गाव संघटनेचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (CA Foundation Result) (Juventus vs Lazio) (Viswanath) (Michael movie Review) (JEE Mains Answer Key 2023) (The Last of Us)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here