रांगीत तान्हा पोळ्या निमित्ताने वेशभूषा स्पर्धा संपन्न
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०४ : तालुक्यातील रांगी येथे प्रथमच तान्हा पोळा भरविण्यात आला. याच तान्हा पोळ्याच्या निमित्ताने गावातील हनुमान मंदिर येथे वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सर्वत्र तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात येतो. रांगी येथे पहिल्यांदाच तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील बाल गोपाळ हनुमान मंदिर परिसरात गोळा झाले. मंदिरामध्ये पूजा करून सर्व नंदी बैल घेऊन आलेल्या बाल गोपालांची नंदी बैल सजावट व वेशभूषा बघून सर्वाचे कौतुक करण्यात आले. त्या नंतर उपस्थितीत सर्व बाल गोपालाना श्रीमती कमलताई बोरसरे, सारिकाताई हेमके, उपसरपंच नुरज हलामी, ग्रामपंचायत सदस्य दिनेश चापले, शशिकला मडावी, प्रल्हाद उंदिरवाडे, काटेंगे, मिलिंद हेमके, शमीर पठाण, दिलीप महाराज काटेंगे, हरी वालदे, दामाजी बोरसरे, जीवन टेकाम, किशोर कुळमेथे, देवाभाऊ कुणघाटकर, हार्दिक भैसारे, हारीश पठाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक योगेश चांदणखेडे यांनी केली तर सर्वांचे आभार सोनु पठाण यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी साहिल कूमोटी, महेश गुंडरे, वृषभ देशमुख, स्वराज कन्नाके, राजू हलामी, स्वप्नील काटेंगे, जावेदअली सय्यद, सोहेल पठाण, साजिद पठाण, मनोज मेसरकर, अरुणभाऊ चापले, महेश दूगा, ठूमराज कुकुडकर, अजमेर पठाण व गावातील महिला पुरुष व तरुण वर्ग उपस्थितीत होते. प्रथम, द्वितिय, तृतिय आलेल्या स्पर्धकांना रोख बक्षीस देण्यात आले व उपस्थित बाळ गोपाळांना प्रसाद वाटप करण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora #rangi #tanhapola #polautsav )