– अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १० ऑक्टोबर : तालुक्यात अवैधरित्या रेतीची तस्करी करणाऱ्यांवर महसूल विभागाने धाडसत्र राबवत तुकुम घाटावरून होत असलेल्या अवैध रेती वाहतूक होत असलेली ट्रॅक्टर ९ ऑक्टोबर रोजी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. तालुक्यातील हि दुसरी घटना असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
तुकुम घाटातुन अवैध रेती वाहतूक और असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता महसूल विभागाने धाड टाकून एमएच ३३ एफ ४८२३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला रंगेहाथ पकडत ती जप्त केली असल्याचे समजते.
महसूल विभाने यापुर्वीही कारवाई करीत सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले आहे. गणेश बळिराम मोटघरे यांच्या मालकीची ट्रॅक्टरन असून दंडात्मक कारवाई तहसीलदार ए. बी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डी. के. वाळके व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली . यावेळी मंडळ अधिकारी सरपे, नितीन नंदावार, कोतवाल हलामी उपस्थित होते . या कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.