– प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून केला शुभारंभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या “महा विजय २०२४” या प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. चामोर्शी येथील जुने वयस्क भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हिरवी झेंडी दाखवून भाजपाला विजयी करण्याचा संकल्प करीत प्रचार रथाला रवाना केले.
यावेळी लालाजी सूर्यवंशी, निर्मल देवनाथ, शंकरी देवनाथ, दिलीप चलाख, सुरेश शाहा, साईनाथ बुराडे, जयराम चलाख, प्रतीक राठी, रामचंद्र वरवाडे, शंकर दास, दीपक वासेकर, सावन गव्हारे, अंशुल दासरवार, गौरव गाण्यरपवर, गौतम तराफदार, अक्षय लांजेवार, सुभाष कुणघाडकर यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.