The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २३ : तालुक्यातील रांगी बायपास रोडवर भ्रमनध्वनि मनोऱ्या समोर धान भरून उभ्या असलेल्या ट्रक ला चारचाकी वाहनाने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले तर गाडी छतिग्रस्त झाल्याची घटना २२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
मोहलि येथुन धान भरलेले मिनी आरमोरीला जात होते. जात असताना रांगी बायपास रोडवरील भ्रमणध्वनी मनोरा समोर तिन धान्य भरलेले ट्रक उभे होते. त्यापैकी ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ३२०१ ला समोरुन येणारे एमएच ३३ वी १९४६ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. यात सौ.अंजली स्पार्टा शेन्डे (अंदाजे वय ३५ ) ब्रम्हपुरी आणि चालक सुरेद्र नैताम (वय ३०) ठाणेगाव यांचा समावेश आहे. त्यांच्यावर रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.