– आमदार डॉ. देवराव होळी यांचे लाडक्या बहिणींना उपस्थित राहण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस (देवा भाऊ) यांच्या लाडक्या बहिणींचा मेळावा चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपुर व आष्टी येथे उद्या ३० सप्टेंबरला आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.
चित्तरंजनपूर येथे काली माता मंदिरासमोरील परिसरात सकाळी ११ वाजता होणार असून दुपारी २ वाजता आष्टी येथील शासकीय विश्रामगृह परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची नवीन नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच आमदार डॉ. देवराव होळी यांनी निधी उपलब्ध करून दिलेल्या महिला प्रभाग संघाच्या सभागृहांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.