कुरखेडा येथे उद्या भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन

264

– आमदार कृष्णाजी गजबे उद्घाटक म्हणून राहणार उपस्थित
The गडविश्व
गडचिरोली,१७ डिसेंबर : संत गाडगे महाराज मंडळ, कुरखेडा च्या वतीने उद्या रविवार १८ डिसेंबर रोजी वैरागमुर्ती संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य विदर्भ स्तरिय खंजेरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या सायंकाळी ५ वाजता कुरखेडा येथील हुसैनि कॉम्प्लेक्स श्रीराम नगर येथे सदर खंजेरी भजन स्पर्धा आयोजित केली असून उद्घाटक म्हणून आमदार कृष्णाजी गजबे, सहउदघाटन नगरसेवक बबलू भाई हुसैनी, अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा सौ. अनिताताई बोरकर, उपाध्यक्ष म्हणून माजी.जि.प.सदस्य भाग्यवान टेकाम तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.नरेंद्र आरेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेकरिता विविध पुरस्कार ठेवण्यात आले असून पुरुष तसेच महिला गट विभागण्यात आले आहे. पुरुष गटाकरिता प्रवेश फी ७०१ तर महिला गटाकरिता ५०१ रुपये ठेवण्यात आली आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here