एका कट्टर जनमिलिशियास गडचिरोली पोलीसांकडून अटक

1682

– महाराष्ट्र शासनाने दीड लाख रुपयांचे बक्षीस केले होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : टीसीओसी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल २१ मार्च २०२४ रोजी अटक केली. पेका मादी पुंगाटी (वय ४९) रा. मिरगुळवंचा, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे अटक केल्येल्याचे नाव आहे.
पोलीस दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. काल २१ मार्च २०२४ रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये भामरागड क्युआरटी, पोस्टे भामरागड पार्टी व सिआरपीएफचे जवान पोस्टे परिसरातंर्गत नाकाबंदी करीत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड सा. यांना नाकाबंदी ठिकाणाच्या आसपास एक व्यक्ती संशयीतरित्या वावरत असतांना दिसून आल्याची माहिती मिळाली असता त्यावरुन त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच १९ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीचे २२:०० वाजताच्या सुमारास हिद्दुर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावण्यात आलेल्या ०३ टॅक्टर व १ जेसीबी जाळपोळ करुन तेथील मजुरांना मारहाण व दमदाटी करण्याच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे कलम 435, 427, 323, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, सह कलम 5, 28 भाहका, सह कलम 13,16,18,20,23 युएपीए ॲक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरव्यानिशी निष्पन्न झाल्याने २१ मार्च २०२४ रोजी सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. तसेच सन २०१६ मध्ये एका पोलीस अंमलदाराचे अपहरण करुन खुन केल्याच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे कलम 302,364,353,143,147,148,149 120 (ब) भादवि, सह कलम 3, 25 भाहका, सह कलम 135 मुपोका मध्ये देखील त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच अधिक तपासात या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे
– जाळपोळ – ०१
– सन २०२३ मध्ये हिद्दुर गावात झालेल्या जाळपोळीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
– खुन – ०१
– सन २०१६ मध्ये एका पोलीस अंमलदाराचे अपहरण करुन त्याचा खुन करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
– महाराष्ट्र शासनाने पेका मादी पुंगाटी याच्या अटकेवर १.५ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७४ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

(#thegadvishva #thegdv #gadchirolipolice #gadchiroli news #crimenews #naxal )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here