पोलीस- नक्षल चकमकीत ८ लाखांचे बक्षीस असलेला नक्षली ठार

1262

– घटनास्थळावरून स्फोटकांसह इतर दैनंदिन साहित्य जप्त
The गडविश्व
बिजापूर, १७ ऑक्टोबर : जिल्ह्यातील मद्देड़ पोलीस ठाण्याअंतर्गत येत असेलेल्या बंदेपारा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक १६ ऑक्टोबर रोजी उडाली. या चकमकीत मद्देड़ एरिया कमेटी इंचार्ज नागेश पदम ठार झाला आहे. त्यावर आठ लाखांचे बक्षीस जाहिर होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरंजेड-बंदेपारा च्या जंगलात मद्देड़ एरिया कमेटी प्रभारी L A नागेश, सचिव ACM बुचन्ना, ACM विश्वनाथ व अन्य १५ ते २० सशस्त्र नक्षली असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता बीजापुरच्या डीआरजी, बस्तर फाइटर, एसटीएफ व केरिपु १७० च्या संख्येत संयुक्त टीम जंगल परिसरात अभियान राबवित असतांना कॅम्प लावून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही मोर्चा सांभाळत गोळीबार केला असता वाढता दबाव पाहून नक्षली पसार झाले. दरम्यान घटनास्थळी झडती घेतली असता नक्षली पोशाख परिधान केला असलेला एक नक्षली ठार झालेला आढळून आला. त्याकडील ०१ नग AK-४७ रायफल, AK-४७ की ०३ मैग्जिन, AK-४७ के ५४ राउण्ड,स्फोटके, औषधी, साहित्य, वर्दी, बॅनर, सोलर पैनल, इलेक्ट्रीक वायर व अन्य दैनंदिन साहित्य हस्तगत करण्यात आले. मृतक नक्षलीची ओळख मद्देड़ एरिया कमिटी प्रभारी व्हीसीएम नागेश पदम या नावाने करण्यात आली. त्याविरुद्ध बिजापूर जिल्ह्यातील विविध ठाण्यात एकूण १०८ गुन्हे दाखल असून त्यावर छत्तीसगढ सरकार तर्फे ८ लाखांचे बक्षीस जाहीर होते.

(AK47, firing, chattisgadh, bijapur, The Gadvishva, The Gdv)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here