-अहेरी येथे मुक्तिपथ तालुका समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : अहेरी य येथील तहसील कार्यालयात मुक्तिपथ तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत तालुका स्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी अवैध दारु व तंबाखु विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करून कृती आराखडा तयार करण्यात आला.
या बैठकीला नायब तहीलदार नरेंद्र दाते, नायब तहसीलदार वाभीटकर, पी.एस. आय काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.आर.उमाटे, एन.एन.एसचे प्रा. घोडेस्वार, विस्तार अधिकारी वी. एस. निखाडे व ईतर प्रशासकीय अधिकारी यांच्यासह मुक्तीपथ तालुका संघटक विनल बंडेवार, राहूल महाकुलकर, नंदिनी आशा उपस्थित होते.
या बैठकीत पुढील 3 महिन्यात तंबाखुमुक्त शाळा कशा करता येईल यावर कृति कार्यक्रम आराखडा तयार करणे. गावातील तसेच शहराच्या ठिकाणी संघटन मजबूत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे. अवैध दारू विक्रेत्यावर जास्तीत जास्त प्रमाणात कार्यवाही करणे. पोलिस पाटील यांची बैठक आयोजित करून गावातली अवैध धंदे बंद करून दारुमुक्त गाव करणे. गरोदर स्तनदा माता यांना तंबाखूचे दुष्परिणाम यावर योग्य मार्गदर्शन मिळवुन देणे यासह विविध मुद्द्यावर चर्चा करून तालुक्यातील अवैध दारू व तंबाखूचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे सूचना तहसीलदार यांनी दिले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )