कुरखेडा येथील खासगी डॉक्टरने केला महिला रुग्णाचा विनयभंग : पोलिसांनी ठोकल्या बेडया

1924

– १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १४ जून : तालुका मुख्यालय असल्याने ग्रामीण भागातील नागरिक तालुका मुख्यालयी उपचाराकरिता येत असतात. याचाच फायदा घेत औषधोपचार करीता ग्रामीण भागातून कुरखेडा येथे आलेल्या विवाहीत महिलेची छेड काढत विनयभंग करणाऱ्या खासगी डॉक्टरला महिलेच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या व बुधवार १४ जून रोजी प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायलयाने आरोपीला १४ दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी डॉक्टरची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार कुरखेडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीक आरोपी डॉ. जिबन हिरा याचा क्लिनिक आहे. मागील १५ दिवस ग्रामीण भागातील एक महिला त्याकडे उपचार घेत होती. तपासणी दरम्यान डॉ. हिरा हा महिलेशी अश्लील चाळे करत असल्याने महिला संतापली होती. काल मंगळवार १३ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ग्रामीण भागातून ती महिला परत तपासणी करिता आली होती मात्र यावेळी औषधोपचार न करता वाईट हेतूने डॉक्टर छेड काढत असल्याचे महिलेला जाणवताच सदर डॉक्टरला दवाखाण्यातच महिलेने बदडून काढले. दरम्यान महिलेसोबत आलेल्या तिच्या पतीनेही चांगला चोप दिला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी संगितले. यावेळी त्यांच्या तावडीतून सुटत घराकडे सदर डॉक्टर ने पळ काढला. त्याला येथील आंबेडकर चौकात ही चोप बसल्याची माहिती आहे. सदर घटनेनंतर महिलेने पोलीस स्टेशन कुरखेडा गाठून तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी डॉ. जिबन हिरा (२८) याच्या विरोधात भादवि ३५४, ३५४(अ) ३५४ (ब) अन्वये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. आज त्याला न्यायलयात हजर करण्यात आले असता न्यायलयाने १४ दिवसाची यायलयीन कोठडी सुनावली असून चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शितल माने करीत आहे. ©©
(the gdv, the gadvishva , kurkheda, gadchiroli news, crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here