कुरखेडा येथे व्हॉइस ऑफ मीडिया तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

466

The गडविश्व
ता/प्र (चेतन गहाने) कुरखेडा १७ सप्टेंबर :  व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची पहिली आढावा बैठक गडचिरोली जिल्हाध्यक्ष यांच्या नियोजनानुसार कुरखेडाच्या शासकीय विश्रामगृहात १७ सप्टेंबर २०२३ ला  घेण्यात आली.
या आढावा बैठकीचे अध्यक्ष गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्येंकटेशजी दुडमवार तर राज्य कार्यवाहक संजयजी टिपाले, विदर्भ कार्याध्यक्ष सुमितजी पाकलवर, कार्याध्यक्ष नसीर हाशमी, जिल्हा संघटक विनोद नागपूरकर, जिल्हा सदस्य जयंतजी निमगडे व कुरखेडा तालुक्यातील सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
आढावा सभेची प्रस्ताविक कार्याध्यक्ष नासीर हाश्मी यांनी मांडली. व्हॉइस ऑफ मीडियाच्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती यावेळेस उपस्थित पत्रकारांना देण्यात आली.  व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची स्थापना झाल्यापासून संघटनेकडून पत्रकारांना विविध प्रकारच्या सोई सुविधा मिळाव्या म्हणून प्रयत्न करीत आहे अशी माहिती बैठकीत जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांनी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे कार्य, पत्रकारांचे अधिकार तसेच पत्रकारांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार भवन व ओळखपत्र व येत्या २ ऑक्टोंबर २०२३ रोजी मुल येथे एक दिवसीय कार्यशाळा होत असून कार्यकारणीची उपस्थिती अनिवार्य असे सांगत सविस्तर मार्गदर्शन केले.
व्हाईस ऑफ मीडिया राज्यकार्यकारणीमध्ये राज्य कार्यवाहक या पदावर संजयजी टिपाले यांची निवड झाल्याबद्दल कुरखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडियातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच बैठकीत आलेल्या विदर्भ व जिल्हा पदाधिकारी या सर्वांचे तालुका कार्यकारणी कडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कुरखेडा व्हॉइस ऑफ मीडिया संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकारांना संघटनेत समाविष्ट करण्याची तयारी दर्शविली.
सदर आढावा बैठकीला रमेश बोरकर, सिराज पठाण, विजय भैसारे, विनोद नागपूरकर, रुपेंद्रसिंग सेंगर, चेतन गाहाने, ताहीर शेख, गीतेश जांभुळे, श्याम लांजेवार, कृष्णा चौधरी, सुरेंद्र सहारे, महेंद्र लाडे, शालिकराम जनबंधू, दीपक धारगाये, राकेश चौहान, विजय नाकाडे आदी पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here