– ५० टक्के खड्डे बुजवले नाहीत, दुरुस्तीत काय साध्य ?
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १९ : तालुक्यातील रांगी ते बेलगाव रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन धारकांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हि बातमी प्रसिद्ध झाली आणि संबंधित विभागाने रस्त्याची नाममात्र डागडुजी केली. त्यात अर्धे ही खड्डे बुजवले नसल्याने ही डागडुजी कोणत्या कामाची असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत.
रांगी वरुन गडचिरोली कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या या मार्गावर मोठीच वर्दळ असते, चारचाकी वाहने व एस.टि.महामडळाची बस सुद्धा दररोज धावते. पण रांगीच्या समोर बेलगाव दरम्यानचा रस्ता वाहन चालकांना मोठा त्रासदाय आहे . जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या मार्गावर काही खड्डे बुजवले पण बाकी जसेच्या तसेच ठेवल्याने वाहन धारकांना कमालीचा त्रास सोसावा लागत आहे. प्रशासनाने सदर रस्त्याचे दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.
रांगी परिसरातील कार्यरत असलेले शाळांचे शिक्षक, जिल्हा परिषद, खाजगी शाळांचे शिक्षक, आरोग्य कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी, बँकेचे कर्मचारी याच मार्गाने गडचिरोली जातात मात्र रस्त्यांची दुरवस्था झाल्या नंतर अनेकांना पाठीच्या मनक्याचा व कमरेचा त्रास सहन करावा लागत आहे. फक्त ६ कि.मी.अंतरात अनेक ठिकाणी डांबरीकरण उकडून खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता फुटला आहे. या मार्गाची वेळीच दखल घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले खरे पण डागडुजी करतांना रस्त्यावरील ५० टक्के खड्डे बुजवल्या गेले नाहीत.त्यामुळे ही डागडुजी कोणत्या कामाची असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत.
