– विद्याभारती महाविद्यालयाजवळ झाला होता अपघात
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाणे) १९ फेब्रुवारी : येथील विद्याभारती महाविद्यालय जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाची मृत्यूशी झुंज संपली असून आज १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
भुनेश्वर लिल्हारे (३८) रा.चिखली असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. ते कुरखेडा येथील श्रीराम विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. १० फेब्रुवारी रोजी नेहमी प्रमाणे ते चिखली येथून कुरखेडा येथे विद्यालयात जात असतांना वडसा मार्गावर असलेल्या विद्याभारती महाविद्यालय जवळ भुनेश्वर लिल्हारे यांना सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने व प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आज १९ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The GDV )