गडचिरोलीत वाघ बिनधास्त : आणखी एका महिलेवर हल्ला करीत केले जखमी

1495

– वनविभागास देत आहे हुलकावणी
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) ४ डिसेंबर : जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहे. अश्यातच वाघास जेरबंद करण्याच्या मागावर असलेल्या पथकास वाघ हुलकावणी देत बिनधास्तपने मानवावर हल्ले करीत आहे. आणखी एका महिलेवर हल्ला केल्याची घटना जिल्हा मुख्यालयापासून जवळ असलेल्या आंबेशिवनी परिसरात ४ डिसेंबर रोजी घडली आहे. यात महिला गंभीर जखमी असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोनम उंदिरवाडे (२५) रा. आंबेशिवनी असे गंभीर जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार महिला ही शेतशिवारात गेली होती दरम्यान वाघाने तिच्यावर झडप घेऊन गंभीर जखमी केले. जवळच असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने वाघाने पळ काढला. जखमी महिलेस उपचाराकरिता तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
सदर परिसरात वाघाचा वावर असून अनेकांवर हल्ले केले आहे. वाघास जेरबंद करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक वारंवार करीत आहे. एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वात नागरिकांनी वनरक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले होते. वाघास जेरबंद करण्यास वनविभाग कसोशीने प्रयत्न करीत असून त्यांना वाघ वारंवार हुलकावणी देत आहे. यात मात्र वनविभाग अपयशी ठरत आहे. वारंवार आशा घटनेने मटार मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचलेला असून वाघास जेरबंद केव्हा करण्यात येईल ? असा आर्त प्रश्न नागरिक विचारीत आहे.

(Tiger Attack) (The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Gadchiroli Forest) (Tigers)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here