अवैध सुगंधीत तंबाखू घेऊन जाणारे वाहन जळून खाक

234

The गडविश्व
ता. प्र / कोरची, २६ : तालुका पासून जवळच असलेल्या नवरगांव-कोरची मार्गावर अवैधरित्या सुगंधित तंबाखुची तस्करी करणारे वाहन जळून खाक झाल्याची घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
एमएच ३३ एजी ७००१ क्रमांकाची अर्टिगा वाहन समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने या वाहनाने रस्त्याच्या बाजुला असलेल्या बोटेकसा मार्ग दर्शविणाऱ्या पोलला धडक दिली. यात वाहनाला आग लागून वाहन जळून नष्ट झाले. वाहनामध्ये सुगंधी तंबाखू असल्याने गाडी चालक तिथून फरार झाला. या घटनेत गाडी मालकाचे २० लाख रुपयांचे रुपयांचा नुकसान झाले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना गाडी जळत असल्याचे दिसून येताच त्यांनी नगरपंचायतला माहिती दिली. अग्निशमन वाहन तात्काळ बोलवण्यात आले. अग्निशमन वाहनाद्वारे आग विजवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अखेर गाडी जळून खाक झाली पण गाडी चालक गाडीमध्ये असलेला सुगंधी तंबाखू घेऊन पळाला अशी चर्चा सुरू आहे. पण उर्वरित असलेला तंबाखू गाडीमध्ये दिसत आहे. याचा अर्थ असा की ही गाडी नेहमी याच रोडवर नियमित छत्तीसगड मधून सुगंधित तंबाखू आणून कोरची, कुरखेडा, वडसा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात सुगंधीत तंबाखू पुरवल्या जातो अशी चर्चा सुरू आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले होते. गावकऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळी लोकांची गर्दी जमली होती. वाहन जळाल्याची तालुक्यात ही दुसरी घटना आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #korchi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here