दारूच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्यांची शिबिराला भेट

162

-विविध गावांतील ५० रुग्णांवर उपचार
The गडविश्व
गडचिरोली, ८ फेब्रवारी : दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होऊन व्यसनमुक्त होण्याची इच्छा असलेल्या विविध गावातील ५० रुग्णांनी मुक्तिपथच्या गाव पातळीवरील व्यसन उपचार शिबिराला भेट दिली. या शिबिरातून तज्ञांनी रुग्णांना दारूचे व्यसन उपचाराने बरा होऊ शकते, हे पटवून दिले.
धानोरा तालुक्यातील रिडवाही या गावात शिबिराचे आयोजन केले असता एकूण १७ रुग्णांनी उपचार घेतला. समुपदेशन प्राजक्ता मेश्राम तर केस हिस्ट्री छत्रपती घवघवे यांनी घेतली. शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील सरपंच हरिष धुर्वे, गावपाटील लोभुराम धुर्वे, प्रेमीलाताई धुर्वे यांनी सहकार्य केले. शिबिराचे नियोजन व आयोजन मुक्तिपथ तालुका प्रेरक भास्कर कड्यामी व राहुल महकुलकार यांनी केले. अहेरी तालुक्यातील कटेपल्ली येथील शिबिरातून १८ पेशंटनी पूर्ण उपचार घेतला. शिबीराचे नियोजन तालुका प्रेरक आनंदराव कुम्मरी यांनी केले. केस हिस्ट्री संयोजिका पूजा येल्लुरकर, स्पार्क कार्यकर्ता स्वप्नील बावणे, ट्रेनी कौन्सेलर दशरथ यांनी केले व समुपदेशन साईनाथ मोहूर्ले यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावातील उपसरपंच लक्ष्मण अत्राम, महेश झाडे यांनी मदत केली. कुरखेडा तालुक्यातील आंधळी येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. त्यात १५ पेशंटने पूर्ण वेळ उपचार घेतला. प्राजू गायकवाड यांनी समुपदेशन केले. प्रभाकर केलझरकर व कान्होपात्रा राऊत यांनी केस हिस्ट्री घेतली व मयूर राऊत यांनी नोंदणी केली. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच उज्ज्वला रायसिडाम, उपसरपंच अपोल भैसारे, गाव संघटन अध्यक्ष नानाजी खुणे व इतरांनी अथक परिश्रम केले. विशेष म्हणजे या गावात दुसरी वेळ शिबिर घेण्यात आले.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Bank of Baroda) (Kriti Sanon) (Bing) (Lakers) (Ravi Shastri) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here