The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०८ : तालुक्यातील रांगी येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चा असून या दवाखान्याची बांधलेली इमारत सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची गळती लागली असुन पशुवैद्यकीय दवाखाना पूर्णपणे जलमय झाले असून दवाखान्यातील सर्वच खोलीमध्ये पाणी साचले असल्याने कर्मचाऱ्यांनी बसावं कुठे हा प्रश्नच निर्माण झालेला आहे.
रांगी येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना असून दवाखान्याकरीता स्वतंत्र इमारत बांधलेले आहे. परंतु सध्या हीच इमारत मागील पंधरा दिवसापासून पडणाऱ्या पावसाने इमारत गळती मोठ्या प्रमाणात असून स्लॅबमधून पाणी टपकत आहे. फरशीवर पाणीच पाणी साचलेले असल्याने कर्मचाऱ्यांनी थांबावे कुठे, बसावे कुठे, औषध ठेवायची कशी, कशा पद्धतीने ड्युटी करावी हा प्रश्न निर्माण झाला झालेला आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्याची ईमारत पाण्याने ओलीचिंब झाली आहे. वेळीच दुरुस्ती करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )