– वाघाचे हल्ले थांबता थांबेना , परिसरात दहशतीचे वातावरण
The गडविश्व
ता.प्र / सावली, २० मे : तालुक्यात वाघाचे हल्ले थांबता थांबेना. तालुक्यातील वाघोली बुटी येथे महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवार २० मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. प्रेमिला मुखरू रोहनकर (५५ ) असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रेमीला ह्या नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून ठार केले. सदर घटनेची माहिती गावात व परिसरात पोहचताच नागरिकांची झुंबड पहावयास मिळाली तर सदर घटनेने परिसरात वाघाची दहशत पसरली असून वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा प्रेत हलणार नाही अशी गावकऱ्यांची मागणी होती. तालुक्यात सातत्याने वाघाचे हल्ले होत असल्याने वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी रास्त मागणी असून वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर घटनेनंतर पुन्हा किती लोकांचा जीव जाण्याची वाट वनविभाग पाहणार अशी चिंता व्यक्त करण्यात येत असून पुन्हा मागणी जोर धरत आहे.©©©
(he gdv, the gadvishva, saoli, tiger attacak)