– मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन व त्यांची टीम करणार रुग्णांची तपासण
The गडविश्व
गडचिरोली, १ एप्रिल : शरीराचे दुखणे हाताळणे कठीण होऊ शकते, आणि जर लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात. अशा वेळी डॉक्टरांकडे जाणे आणि उपचार घेणे महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या बघता व मागील महिन्यात झालेल्या ओपिडीला रुग्णांचा प्रतिसाद बघता सर्च येथील माँ दंन्तेश्वरी दवाखान्यात १ एप्रिल २०२३ला ही वेदना व्यवस्थापन ओपिडी राहणार असून ही ओपीडी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी होईल.
ह्या ओपीडी चे मार्गदर्शन मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन हे करतील. या ओपीडी मध्ये पाठीचा कणा दुखणे ,पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे,मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे या सर्वांचा उपचार होईल.तसेच पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा आणि अवघडलेपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, आतडी आणि मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे,टाचेचे दुखणे,डोकेदुखी,नागिण(एक त्वचारोग) यामुळे होणार्या वेदना व तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर च्या वेदना या सर्वांवर उपचार होईल. तरी या वेदना व्यवस्थापन ओपिडीचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना नोंदणी करण्याचे आवाहन सर्चच्या व्यवस्थापनाणे केले आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) ( Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023)