अबब…गोंडवाना विद्यापीठातील लिपीकांनी केली करोडो रूपयांची अफरातफर

1903

– विद्यापीठ प्रशासानात खळबळ, आरोपींना १० जून पर्यंत पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, दि.०६ : स्थानिक गोंडवाना विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या तीन लिपीकांनी एका वाहन चालकासह विद्यापीठ अंतर्गत तब्बल दीड कोटी रुपयांची अफरातफर केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सदर प्रकाराने विद्यापीठ प्रशासन खळबळून जागे झाले असून कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महेशकुमार उसेंडी निम्न श्रेेणी लिपीक, कुमारी प्रिया पगाडे उच्च श्रेणी लिपीक, अमोल रंगारी निम्न श्रेणी लिपीक व अमीतकुमार जांभुळे वाहन चालक या चौघांविरुद्ध पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यातील महिला आरोपी वगळता तिघांना अटक करून न्यायालयात दखल केले असता १० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर पठारे हे गोंडवाना विद्यापीठामध्ये वित व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०२३-२०२४ या वर्षाकरीता विद्यापीठाचे अंकेक्षण करण्यासाठी मे २०२४ मध्ये आर्थिक व्यवहारासंदर्भातील कार्यालयीन अभिलेखाचा आढावा घेवून संबंधित अभिलेख अदयावत करून ठेवणे संबधात संबधित लिपीकांना आदेशित केले होते. त्या दरम्यान विद्यापीठा अंतर्गत प्राध्यापक व इतर मान्यवर तसेच कर्मचारी यांचे प्रवास भत्ता, मानधन इत्यादी मान्यतेनुसार धनादेश एनईएफटी ( NEFT) व्दारे शोधन करून संबंधितांना रक्कम अदा करणे इत्यादी शासकीय कामा करीता निम्न श्रेणी लिपी लिपीक महेशकुमार उसेंडी यांच्या कडे कार्यभार सोपविण्यात आलेला होता. त्या संबंधातील अभिलेखाची पडताळणी केली असता त्यांचे कडील अभिलेखा मधील नोंदी मध्ये विसंगती आढळून आल्याने त्यांना पत्र देवून अभिलेख अदयावत करून पडताळणी करीता सादर करण्यास आदेशित केले. परंतु महेशकुमार उसेंडी यांनी सदरचे अभिलेख पडताळणी करीता सादर करण्यास अधिकचा वेळ मागितला त्यामुळे त्यांचे कडील अभिलेखामधील नोंदीची सखोल चौकशी केली असता टी.एम नेटवर्क सॉफ्टवेअर मधुन काढलेल्या धनादेशाची यादी व अभिलेखामध्ये सुध्दा तफावत आढळून आली. त्यांच्या दैनदिन कर्तव्यात संशय बळावल्याने २०२२-२०२३ तसेच २०२३-२०२४ या आर्थीक वर्षामधील वित्त व लेखा अधिकारी यांचे नावाने बॅंक ऑफ इंडिया गोंडवाना विद्यापीठ शाखा गडचिरोली येथील विद्यापीठाचे साधारण निधी खात्यामधून ठरावीक ११ बॅंक खात्यावर वारंवार रकमा वळती केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने पठारे यांनी त्या संदर्भात कुलगुरू यांना माहिती दिली. कुलगुरू यांनी सदर गैरप्रकारासंदर्भात सखोल चौकशी करण्यात मौखीक आदेशित केले. तसेच त्यानंतर सदरचे बॅंक खात्यावरील रकमा ज्यांचे नावाने ट्रान्सफर केले होते त्यासंबंधात स्वत : बॅंकेच्या माध्यमातून पडताळणी केली असता संबंधित बॅंक कडून हस्तगत करण्यात आलेल्या स्टेटमेंटचे अवलोकन नुसार १९ मे २०२२ ते २९ एप्रिल २०२४ दरम्यानच्या कालावधीत महेशकुमार उसेंडी यांनी स्वतः चे तसेच कुमारी प्रिया पगाडे, उच्च श्रेणी लिपीक, अमोल रंगारी निम्न श्रेणी लिपीक, अमीतकुमार जांभुळे वाहन चालक यांचे बॅंक खात्यावर एकुण १ कोटी ४६ लाख ५८ हजार ३१६ रूपये वळती केल्याचे निदर्शनास आले.
सदर प्रकार उघडकीस आल्याने, महेशकुमार उसेंडी, कुमारी प्रिया पगाडे, अमोल रंगारी, अमीतकुमार जांभुळे यांच्याविरोधात पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार दाखल करून पोलिसांनी ४२०, ४०९, १२० B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर प्रकराने विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली असून एवढा मोठा आर्थिक गैरव्यवहार विद्यापीठात झाल्याने कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात राजकुमार मडावी करीत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gondwanauniversity #loksabhaelection2024 #lokssbhaelectionresult2024 #crimenews #Australia vs Oman #Papua New Guinea vs Uganda #Ireland vs India #Who won the election 2024 #Modi resignation #Devendra Fadnavis)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here