The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी पोटविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. पोटविकार ओपीडी करीता नागपूर येथील पोटविकार तज्ञ डॉ.सिद्धार्थ धांडे यांच्या सहकार्याने पोटविकार ओपीडीमध्ये आरोग्य तपासणी व फाईब्रोस्कॅन तपासणी करण्यात येइल.
फायब्रोस्कॅन चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी यकृताच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. हे यकृताची कडकपणा आणि लवचिकता मोजते, जे फायब्रोसिस आणि सिरोसिस सारख्या यकृत रोगांची उपस्थिती आणि तीव्रता याबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करू शकते. यकृताची स्थिती निर्धारित करण्यासाठी हे उपकरण कंपनाचा वेग मोजते. हिपॅटायटीस सी, यकृत रोग आणि अल्कोहोल-संबंधित यकृत रोग यासारख्या परिस्थिती असलेल्या रुग्णांमध्ये यकृताच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही चाचणी वापरली जाते.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे, फाईब्रोस्कॅन व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करित आहे. तरी शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी होणा-या पोटविकार विशेष तपासणी शिबिराचा लाभ, जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #thegadvishva #gadchirolilocalnews )