-४ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : चामोर्शी तालुक्यातील नरेंद्रपुर येथील दारू विक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी नुकतेच घोट पोलीस, वनविभाग, ग्रामपंचायत समिती, गाव संघटना व मुक्तीपने जंगलपरिसरातील चार दारू भट्ट्या उध्वस्त केल्या. घटनास्थळावरून ४७ बोरी मोह सडवा व ८ लोखंडी ड्रम असा एकूण ४ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करीत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावातील काही विक्रेत्यांनी परिसरात हातभट्टी लावून दारू गाळत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे घोट पोलीस स्टेशन ,गाव संघटन, ग्रामपंचायत समिती व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली असता, चार हातभट्टया आढळून आल्या. यावेळी ४७ बोरे व ८ ड्रम मोहफुलाच्या सडव्यासह ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन दारू विक्रेत्यांवर घोट पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष महेश बिश्र्वास, ग्रामपंचायत सदस्य सरोज तरफदार, संतोष राऊत, युवा सदस्य किशोर कुंडू, लक्ष्मीकांत मंडल, बिरेन तरफदार, कमल विश्वास, विश्वजित विश्वास, मुक्तीपथ चे आनंद इंगळे, आनंद सिडाम ,विनोद पांडे यांचा विशेष सक्रिय सहभाग होता. विशेष म्हणजे येथून बाजूच्या गावात दारू पुरवठा होत आहे. गाव संघटन अध्यक्ष मंजू तरुण ढाली व इतर महीला सहकाऱ्यांनी दारू बंदीचा निर्धार करून युवक वर्गाच्या सहकार्याने दारू बंद करण्याचे ठरविले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )