The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : धानोरा येथील तहसील कार्यालयात मुक्तिपथ तालुका समितीची बैठक तहसीलदार ए.व्ही. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत धानोरा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातून अवैध दारू व तंबाखूची विक्री बंद करण्यासाठी कृती करण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीत शहरातील तसेच ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीला आढा घालण्याबाबत विस्तृत चर्चा करून कृती आराखडा तयार करण्यात आला तसेच शहर परिसरात तंबाखूजण्य पदार्थ विक्री बंद करण्यास प्रशासकीय विभाग यांची समिती तयार करण्याचे ठरविले. गावातील तसेच शहराच्या ठिकाणी संघटन मजबूत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे. अवैध दारू विक्रेत्यावर जास्तीत जास्त प्रमाणात कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर चर्चा .
मुक्तीपथ तालुका समितीच्या बैठकीला नायब तहसीलदार डी.के वाळके, ए.व्ही. बारापामे, ठाणेदार स्वप्नील धुळे, पी.एस.आय सुमित चेवले, ए.बी. कोडापे टी. एच. ओ गौतम राऊत, एन.सी.डी विभाग, पी.जी. अटेल, जि.पी. ठाकरे नगर पंचायत प्रतिनिधींसह मुक्तीपथ तालुका संघटक भास्कर कड्यामी, राहूल महाकुलकर व जीवन दहीकर उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipath )