– दारू तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम बैठक संपन्न अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचा आदेश
The गडविश्व
गडचिरोली, ७ फेब्रुवारी : दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यकम अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची, जिल्हाधिकारी कार्यालयात आज ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४.३० ते ५.१५ वाजता दरम्यान बैठक संपन्न झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, मुक्तिपथचे संचालक तपोजेय मुखर्जी, उपसंचालक संतोष सावळकर, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षका स्वाती काकडे, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक स्वाती साठे, पोलीस विभाग एलसीबी पथकाचे उल्हास भुसारी, अन्न औषध विभागाचे सुरेश तोरेम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जठार इत्यादी प्रमुख अधिकारी बैठकीला हजर होते.
यावेळी संतोष सावळकर यांनी मागील २३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृतांत व अनुपालन अहवाल याचे वाचन केले. तसेच मुक्तिपथ अभियान (दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम) याबाबत रूपरेखा व झालेल्या कामाच्या माहितीचे सादरीकरण केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी याअगोदर २३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृतांताचा आढावा घेत, दारू व तंबाखूमुक्त मार्कंडा यात्रेच्या मुक्तिपथने मांडलेला प्रस्तावाला मान्यता दिली. मार्कंडा यात्रा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दारू व तंबाखूमुक्त साजरी होईल. मुक्तिपथ अभियान, प्रशासकिय संबधित विभाग जसे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण चमू, अन्न औषध विभाग, पोलीस विभाग यांचे पथक निर्माण करून अवैध तंबाखू व दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. शिक्षण विभागाने शाळेच्या आजूबाजूला १०० मीटर अंतर्गत असलेले पानठेले हटवणे, शाळा परिसर तंबाखूमुक्त निर्माण करणे यावर भर द्यावा व पुढील बैठकीत आकडेवारी सादर करावी हे संबधित प्रतिनिधीला सांगतिले.
अन्न औषध विभागाने वर्ष २२-२३ मध्ये कलम ६ द्वारे ३६ लोकांवर एकूण ५६०० रु. दंड केला असून २०२१-२२ दरम्यान ३५ प्रकरणात २२,२०,८०१रु. तर वर्ष २२-२३ दरम्यान ९ प्रकरणात ६,८००९४ रु. चा अवैध तंबाखू साठा जप्त केला आहे. पोलीस विभागाने २०१७-२२ या वर्ष कालावधीत २९,६०० रु. दंड कोट्पा-कलम ४ अंतर्गत केला. एनटीसीपी द्वारा ११३ लोकांवर २१,९२० रुपये दंड केला असल्याचे या बैठकीत अनुपालन आहवालात मांडण्यात आले.
या आकडेवारीचा आढावा घेत गडचिरोली शहरात व जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा वापर, खर्रा वापर रोखण्यावर अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, अन्न व औषध विभाग व पोलीस विभागाने कायर्वाहीत सातत्य ठेवावे व वाढ करावी. COTPA कायद्याचा वापर करून दंड करावे इत्यादी सूचना केल्या. जिल्ह्यात अवैध दारुविक्रेत्यावर पोलीस विभाग द्वारा कारवाई जोमात सुरु असून, संबधित गुन्हेगाराला न्यायालयातून अधिक शिक्षा ठोठावण्यात यावी, यासाठी सदर केसेस अधिक ठोस कशा करता येईल यावर चर्चा करण्यात आली. विक्रेताला अधिक दंड होण्यासाठी ९३ बॉंड प्रक्रिया अधिक व्हावी यासाठी एस.डी.एम. यांचे पातळीला कृती गतीने व्हावी. केसेस गुणात्मक पद्धतीने भक्कम करण्यासाठी ठोस पंच उपलब्ध होणे गरजेचे आहे, यासाठी जाणीवजागृती होणे आवश्यक आहे, जनतेने पुढे यावे, तरच गुन्हेगारास कडक शिक्षा होईल असे पोलीस विभागाद्वारे भुसारी यांनी मत मांडले. मुक्तिपथ ग्रा.प. समित्या सक्रीय करून त्याद्वारे कार्यवाही करावी अशा सूचना मा. अतिरक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी बैठकीत दिल्या. मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानत, जिल्हाधिकारी यांचे परवानगीने बैठकीची सांगता केली. या बैठकीला, जि.प.माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी निकम, गेडाम जि.प प्राथमिक शिक्षण विभाग प्रतिनिधी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, मीना दिवटे, राहुल कंकनालवार, दिनेश खोरगडे, राहुल चावरे, डॉ. मृणाली रामटेके, स्थानिक गुन्हे शाखेचे मंगेश राउत, बीटपल्लीवार प.स. गडचिरोली, तसेच, पोलीस विभाग, आरोग्य, शिक्षण, जिल्हा माहिती अधिकारी, इत्यादी विविध विभागाचे प्रमुख आजच्या बैठकीला हजर होते.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Bard AI) (Aaron Finch) (Hogwarts Legacy) (Victoria Gowri) (Ravi Shastri) (Chelsea) (PSG) vs Toulouse)