-डोंगरगाव गाव संघटनेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : तालुक्यातील डोंगरगाव येथे मागील काही महिन्यांपासून अवैध दारूविक्री बंद होती. परंतु, एका विक्रेत्याने दारूबंदीच्या निर्णयाचे उल्लंघन करीत चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरु केला. याबाबतची माहिती मिळताच गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत सदर विक्रेत्यास गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन केले.
गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव येथे अवैध दारू विक्री सुरू होती. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कठीण झाले होते. गावात अनेक समस्या निर्माण झाल्याने गावातील महिलांनी व पदाधिकारी यांनी एकत्र येत दारू विक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी दारूबंदीसाठी कठोर निर्णय घेतला. त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री काही महिने बंद होती. परंतु, एका विक्रेत्याने चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरु केला असल्याची माहिती मिळताच गावातील दारूबंदी संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिलांनी फोनवर दारू उपलब्ध करून देणाऱ्या एका विक्रेत्याला देशी दारुची विक्री करताना रंगेहात पकडुन दारू जप्त केली. याबाबतची माहिती पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी विक्रेत्याकडील देशी दारू जप्त करून कुमोद भोयर नामक विक्रेत्यावर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी गाव संघटन, पोलिस पाटील, ग्रापं पदाधिकारी, मुक्तीपथ टीम उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )