The गडविश्व
गडचिरोली, २१ मार्च : मुक्तिपथ अभियानाच्यावतीने दुर्गम भागात वसलेल्या मिरगुडवांचा, आरेंदा, इतलणार येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून ग्रामीण भागातील ५२ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
भामरागड तालुक्यातील मिरगुडवांचा येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबीर घेण्यात आले. यामध्ये २०जणांनी नोंदणी केली तर १८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. क्लिनिकमध्ये रुग्णाची केस हिस्ट्री नवीन ट्रेनी दशरथ व विद्या पुंगाटी यांनी घेतली. रुग्णांना समुपदेशन व औषधीची माहिती पूजा येल्लुरकर यांनी दिली. गाव पातळी क्लिनिकचे व्यवस्थापन व नियोजन तालुका कार्यकर्ता आबिद शेख व विद्या पुंगाटी यांनी केले. यशस्वीतेसाठी रैनू दुर्वा, मादा दुर्वा, कन्न दुर्वा, विनायक पुंगाटी यांनी सहकार्य केले. अहेरी तालुक्यातील आरेंदा या गावांमध्ये एक दिवसीय गाव पातळी व्यसन उपचार शिबिर संपन्न झाले. यामाध्यमातून १८ पेशंटची नोंदणी केली तर १६ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. एटापल्ली तालुक्यातील इतलणार येथे एक दिवसीय गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १८ रुग्णांनी उपचार घेतले. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यास गावातील दिनेश जेट्टी, शाळेतील मुख्याध्यापक सडमेक यांचे सहकार्य लाभले. शिबिराचे नियोजन रुणाली कुमोटी यांनी केले. रुग्णांची नोंदणी रवि वैरागडे यांनी केली. अशा एकूण ५२ रुग्णांनी विविध शिबिरांच्या माध्यमातून व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nowruz) (Harry Styles) (Patna railway station) (Hindu Nav Varsh 2023) (Tamilnadu Budget 2023)