– महावितरणच्या अधीकाऱ्यासोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांची बैठक
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा संसदीय ऊर्जा कमिटीचे सदस्य डॉ. नामदेव किरसान यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली व गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत विभागातील स्थानिक पातळीवर सुटू शकणाऱ्या विविध समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सदर बैठकीत महावितरण चे अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता संजय डोंगरवार, सह सर्व अधिकारी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, श्रेयस बेहरे उपस्थित होते.
अनेक वर्षापासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कृषीपंपा करीता विद्युत मीटर उपलब्ध करून देणे किंवा सोलर पंप बसविण्यास इच्छुक शेतकऱ्यास तातडीने सोलर पंप उपलब्ध करून देणे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा नियमीत व सुरळीत करण्यात यावे, अतिरिक्त लोडशेडींग करू नये, शासन स्तरावून राबविण्यात येणाऱ्या योजनाचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देणे या सारख्या अनेक विषयावर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.