– भव्य आधार कार्ड शिबिरात घेतला १५० नागरिकांनी लाभ
The गडविश्व
ता. प्र / धानोरा , ३० नोव्हेंबर : पोलीस अधिक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक यतिश देशमुख यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मदत केंद्र सावरगाव हद्दीतील नागरिकांना नवीन आधार कार्ड किंवा त्यामध्ये कोणतेही सुधारणा करण्यासाठी ४० किमी अंतरावर असलेले धानोरा या तालुक्याच्या ठिकाणी ये- जा करावे लागत असून तालुक्याला गेल्यानंतर काम होईल किंवा नाही अशा नेहमी चिंतेत असलेले व त्यांच्या आर्थिक व मानसिकदृष्ट्या अडचणी लक्षात घेऊन २५ ते २७ नोव्हेंबर२०२२ दरम्यान पोलीस दादलोरा खिडकीच्या उपक्रमातूपोलीस मदत केंद्र सावरगाव येथे तीन दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये परिसरातील ८४ नवीन व ६६ आधार कार्ड अपडेट करून देण्यात आले. यामधे लहान मुले मुली शालेय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांचा समावेश आहे. सदर उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना कोणतीही गैरसोय होवू न देता सर्व लोकांना मोफत आधार कार्ड मिळवून दिल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. तसेच ज्यांना लाभ मिळू शकला नाही अशा लोकांसाठी लवकरच पुन्हा पोमके सावरगाव येथे आधार मेळावा आयोजित करून सर्वांना आधार कार्ड मिळवून देण्याबाबत नागरिकांना आश्वासित करण्यात आले.
सदर तीन दिवसीय आधार कार्ड शिबिर सी एस सी संगणक चालक संदीप किरमिरे यांच्या सहकार्याने नियोजनबध्द व शांततेत पार पाडण्यासाठी पोउपनि हनमंत नकाते, प्रभारी अधिकारी पोउपनि विश्वंभर कराळे, पोउपनि मनोज जासूद, एसआरपीएफ चे पीआय पोतदार, पोलीस हवालदार भास्कर किरंगे, सुधाकर उसेंडी, पोलीस नाईक मुलेटी, पठाण तसेच जिल्हा पोलिस दल व एसआरपीएफ गट क्र.१० सोलापूर चे सर्व पोलीस अंमलदार व संपूर्ण टीम यांनी अथक परिश्रम घेतले.