– दोषी पोस्ट मास्तरावर कारवाई करून खातेदाराचे पैसे परत करण्याची मुख्यमंत्री यांना निवेदनातुन मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २ एप्रिल : तालुक्यातील रांगी येथिल पोस्ट आँफिस मध्ये २५ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचा प्रकार २०२१ रोजी उघडकीस आला मात्र या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे १८ ऑगस्ट २०२१ रोजी खातेदाराने पत्राद्वारे कारवाई करण्याची मागणी केली असता अद्याप पर्यंत संबंधित दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने तसेच खातेदारांचे पैसे परत न मिळाल्याने आता परत या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजप अनुसुचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश गेडाम २७ मार्च २०२३ रोजी दिलेल्या निवेदनातुन केली असून खातेदारांचे पैसे परत करून संबंधित दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
रांगी येथील पोस्ट मास्तर फिरोज रहमानखा पठाण यांनी रांगी व परिसरातील १०० पेक्षा अधिक सुकन्या समृद्धी योजना, बचत ठेव योजना चे पैसे लाभार्थिनी रांगी येथिल डाक कार्यालयात जमा केल्याची पोच पावती दिली परंतु प्रत्यक्षात पैसे जमा झालेच नाही. तक्रारी नंतर येथिल खातेदारांच्या खात्यातील २५ लाख रुपयांची उचल करून गरीब खातेदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. सबंधित खातेदारांनी अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. मात्र सन २०२३ उजळले तरी खातेदारांना न्याय मिळालेला नाही तर पोस्ट मास्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. सर्व खातेदारांना न्याय देण्याकरिता पोस्टमास्तरवर कार्यवाही करावी याबाबत जिल्हाधिकारी गडचिरोली, खासदार गडचिरोली जिल्हा लोकसभा निर्वाचन क्षेत्र यांना निवेदनाची प्रत पाठविली. येथिल डाकघर मध्ये शासनाच्या विविध योजने अंतर्गत सेव्हिग खाते, पाँलिसी, आर.डी.व सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत पैशाची गुंतवणूक केली मात्र अनेक लोकांनी भरलेल्या पैशांचा हिशोब कुणाला कळलेला नाही, भरलेल्या पैशांची नोंद पुस्तकात केली गेली मात्र आँनलाईन खात्यावर पैसेच नाहीत, काही लोकांची आरडी मुदत होवुनही पैसेच मिळाले नहीत असा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडलेला असून बहुतेकांच्या भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याची झालेल्या अफरातफर बाबत चौकशी करण्यात यावी, गहाळ झालेली रक्कम लाभार्थाच्या खात्यावर जमा झालेली नाही व अफरातफर करणाऱ्या व्यक्तिवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे पाणी कुठे मुरले हेच लोकांना कळलेले नाही. त्यामुळे संबंधित खात्यात पोस्ट मास्तरने केलेली अफरातफरची रक्कम जमा करून कारवाई करण्याची मागणी भाजपा अनुसुचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश गेडाम यांच्या सह दिनकर कोडाप, संजय गडपायले, नरेन्द्र भुरसे, जयंत साळवे निकेश्वर पटले, हेमचंद जांभुळकर, विलास नाकतोडे, देवानंद चापळे सह खातेदारांनी केली आहे.
या प्रकरणात खातेदारांना कुठवर न्याय मिळते याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
(The gadvishva) (The gdv) (Gadchiroli post office Rangi dhanora)