हळद पीक बाजारात आल्यानंतर हळदीला सुद्धा अल्पभाव

219

– शेतकऱ्यावर कोसळले आर्थिक संकट
The गडविश्व
प्रतिनिधी / यवतमाळ, १५ मार्च : हळद पिकावर करपा रोग आणि इतर रोगाचा प्रादुर्भाव तर होता शिवाय या वर्षी पावसाळा जास्त झाल्या कारणाने, सततधार पाऊस असल्यामुळे जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्या कारणाने हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्पन्नापेक्षा अव्वाच्या सव्वापट्टीने शेतकरी हळद पिकावर खर्च करून बसलेला आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, अशा अनेक पिकावर रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेला शेतकरी आता पुन्हा हळद या पिकामुळे सुध्दा अडचणीत सापडला आहे. हळद हे नुसते शेतकऱ्यांचे पीक नसून विविध आजारावर गुणकारी औषध आहे.हळद पीक नसून ते अनेक रोगांवर बहुगुनकारी आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हळदीचा मसाला म्हणून किंवा मसालेदार भाज्या बनवण्यासाठी होतो. हळदी पासून विविध रंग तयार होतात.हळदीचा बऱ्याच ठिकाणी उपयोग केला जातो. हळद देवाला सुद्धा आपण वाहत असतो. खंडोबा रायाला सुध्दा हळदीचा भंडारा वाहिला जातो. आपण जे देवाला कुंकू वाहतो ते सुध्दा हळदी पासून बनवले जाते. ज्या हळदीची आपण लावगण करतो व काही महिन्याच्या अंतराने नवीन निघालेली हळद घेतो, व ती बाजारात विक्री साठी नेत असतो. परंतु जी लावगण केलेली शिल्लक हळद जुनी असते ती कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळते त्या हळदीला सुध्दा तेवढेच महत्व आहे. त्या हळदीला कोच्या असे संबोधले जाते. व त्या हळदी पासून कुंकू मिळते व ते कुंकू आपण देवाला पूजेसाठी वापरतो. हळदी पासून आपल्याला अनेक फायदे आहेत विविध रोगांवर हळद गुणकारी आहे .हे जरी सत्य असेल तरी शेतकऱ्याला याचा काय फायदा तर पीक म्हणून बाजारात विक्रीस नेल्यास शेतकऱ्यांची पिळवणूक करून त्याची फसवणूक करून बाजार भाव पाडले जातात. त्याला योग्य भाव न मिळता कमी दराने हळद विकत घेऊन त्याच हळदी पासून विविध औषध, रंग, मसालेदार पदार्थ चूर्ण, त्याच बरोबर हिंदू संस्कृती मध्ये विवाह होण्या आधी संपूर्ण शरीर हळदीने माखले जाते. व हळद देवाला अर्पण करून हळदीचा कार्यक्रम असे संबोधले जाते.कितीतरी मिल,फॅक्टरी गोर गरीब जनता हळद या पिकावर अवलंबून आहे. अशा कितीतरी बाबी आपल्याला सहजपणे बाजारात मिळतात परंतु त्यात शेतकऱ्यांचे कष्ट व मेहनत कोणालाच दिसत नाही. हळदीवर विविध प्रक्रिया करून मार्केट मध्य कितीतरी पटीने जास्त दराने विकली जाते.

शेतात राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी शेवटी दरिद्रताच असते. हळदीचे पीक येताच जाणून बुजून हळदीचे बाजार भाव पाडले जातात. हळद लागवड करण्या अगोदर पासून जमिनीची मशागत, लावगण, खत, डवरणी, भर मारणे, कीटक नाशक फवारणी, ड्रीचिंग,काढणी, उकडणे,वीस ते बावीस दिवस वाळवणे, पॉलिश करून नंतर बाजारामध्ये नेल्या जाते. खरंच शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण राजकारणी व पुढाऱ्याला कळेल का ? हा एक चिंतन करण्याचा विषय आहे. हळदीला योग्य भाव मिळाला पाहिजे.
– ज्ञानेश्वर गोविंद चव्हाण
युवा शेतकरी नेते शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हा परिषद निंगनुर सर्कल

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (GPT-4) (Bihar Board 12th Result 2023) (Poco X5 5G) (Sameer Khakhar) ( Imran Khan) (Lawrence Bishnoi) (Adani Enterprises) ( Northern Lights) (Inter Milan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here