The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १० : तालुक्यात अनेक ठिकाणी करण्यात येत असलेल्या कृषीपंपाच्या भारनियमनामूळे रब्बी धान पीक धोक्यात आले आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार यांचा नेतृत्वात १३ मार्च रोजी चक्काजाम व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
कुरखेडा तालूका काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने कुरखेडा-वडसा मार्गावर चक्काजाम आंदोलन व तहसील कार्यालय कुरखेडा समोर धरणे आंदोलन ११ मार्च रोजी करण्यात येणार आहे असे निवेदन यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र ना. वडेट्टीवार हे १३ मार्च रोजी कुरखेडा येथे पोहचत असल्याने आंदोलनाच्या तारखेत बदल करीत हे आंदोलन ना.विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेश महासचिव डॉ. नामदेव कीरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे यांनी दिली आहे.