The गडविश्व
अहेरी, ३ एप्रिल : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता आज शेवटचा दिवस होता. आदिवासी विद्यार्थी संघाटना व अजयभाऊ मित्र परिवार तर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आज ३ एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्यात आले.
यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, रविंद्ररावबाबा आत्राम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अहेरी, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, नंदूभाऊ माट्टामी,अहेरी न.पं.अध्यक्षा रोजा करपेत, अहेरी न.पं .उपाध्यक्ष शैलेश पटर्वधन, विलास सिडाम, नगरसेवक प्रशांत गेडसेलवार, प्रज्वल नागुलवार, अशोक येलमुले, रमेश वैरागडे, वैभव कंकडलावार, राजेश दुर्गे, बाडुभाऊ भोगामी, पवन ताटीकोंडावार, राकेश कुडमेथे, प्रकाश पेदांम, विनोद रामटेके, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक, नरेन्द्र गर्गम,आदी उपस्थित होते.