– श्रीनिवास राऊत यांच्या हस्ते आर्थिक मदत व नैताम कुटुंबाची आस्थेने केली विचारपूस
The गडविश्व
अहेरी, ३० डिसेंबर : तालुक्यातील देवलमरी ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या मौसम गावातील बुग्गीबाई नैताम यांच्या कुटूंबावर आर्थिक संकट ओढवले होते. दरम्यान आविंसचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्फतीने आविसचे सल्लागार श्रीनिवास राऊत यांनी मौसम येथे नैताम कुटूंबीयांची सांत्वन केले. तसेच त्यांना आर्थिक मदत केली.
नैताम कुटुंबाची परिस्थिती गरीब असल्याने त्यांच्या पुढील कार्यक्रमानिमित्य आविसंचे कार्यक्रम यांनी नैताम कुटुंबाला आस्थेने विचारपूस करीत आर्थिक मदत सुपूर्द केली.
यावेळी देवलमरीचे आविस सल्लागार श्रीनिवास राऊत, उपसरपंच हरिश गावडे, माजी उपसरपंच जगनाथ मडावी, ग्राम पंचायत सदस्या विद्या राऊत आविसं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.