अहेरी पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

2852

अहेरी पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या
– कारण अस्पष्ट
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : पोलीस उप मुख्यालय प्राणहिता अहेरी येथे कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई अविनाश सुंदरराव नाईकवाडे ( वय ३८) याने सिलिंग फॅन ला गडपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार ८ डिसेंबर रोजी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सदर घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार पोलीस उप मुख्यालय प्राणीता येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई अमीर सुनील शेट्टे (वय २६) हे पोलीस संकुल इमारतीतील खोली क्रमांक ४ मध्ये वास्तव्यास आहेत. दरम्यान आज सकाळच्या सुमारास अमीर शेट्टे हे आपल्या खोलीच्या गॅलरीमध्ये चित्रपट बघत असताना खोली मधली हॉल मध्ये असलेल्या सीलिंग फॅन ला पोलीस शिपाई अविनाश सुंदरराव नाईकवाडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत कळताच अमर शेट्टे यांनी अहेरी पोलीस स्टेशन गाठून कळविले असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून कलम १९४ BNSS अन्वये मर्ग दाखल करुन तपासात घेतला आहे.
गळफास घेण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास अहेरीचे
पोनि स्वप्नील ईज्जपवार यांच्या नेतृत्वात पोउपनी सागर माने करीत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #aheripolice #susaid)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here