– ग्रामपंचायतला मिळाली नवीन इमारत
The गडविश्व
अहेरी, २४ नोव्हेंबर : जिल्हा परिषद गडचिरोली, पंचायत समिती अहेरी अंतर्गत येतअसलेल्या महागाव (बु) ग्राम पंचायत असून गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत भवन नसल्याने नागरिकांना अडचण होत होती. माजी जि.प.अध्यक्ष .अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, माजी जि.प.अध्यक्ष यांनी ग्राम पंचायत भवनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून सदर नवीन ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम पूर्ण पणे झाले व सुसज्ज इमारत उभी झाली. आज सदर इमारतीचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या लोकर्पण सोहळ्याला महागाव बु. ग्रा.प.सदस्य राजेश दुर्गे, सोनू गर्गम, वंदना दुर्गे, महागाव खुर्द ग्रा.प. सरपंचा रेणूकताई आत्राम, उपसरपंचा कु.उमा मडगूलवार, ग्रा.पं .सदस्य श्रीनिवास आलम, गणेश चौधरी, मधुकर आत्राम, प्रतिष्ठित नागरिक चंद्रजी रामटेके, प्रमोद रामटेके, भिमाना पानेम, सदाशिव गर्गम, शंकर झाडे, शंकर अलोने, नारायण अलोने, दामोदर गोंगाले, लक्ष्मण चिंतावार, शंकर आत्राम, सत्यम वसेकर, विजय अलोने, लिंगाजी दहागावकर, गौरुबाई मुंजामकर, लक्ष्मी दुर्गे, वंदना शंकर दुर्गे, डॉ. येरावर, उषा वेलदी, ग्रामसेवक अनिल बंडावार, शिपाई बाबुराव मोहूर्ले, विलास दुर्गे, महेश बाकेवर नगरसेवक अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, राकेश साडमेक व इतर पदाधिकरी कार्यकर्ते उपास्थित होते.

#Ajay Kankadalwar #Aheri #Mahagao Buj #The Gadvishva #Gadchiroli