The गडविश्व
अहेरी, २४ नोव्हेंबर : तालुक्यातील ग्रा.पं .राजपूर प्याच व बोरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी असताना याकडे दुर्लक्ष केले जात होते मात्र सरपंच व सदस्यांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी समस्या माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे सांगितले असता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे मंजूर करून गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आले. व राजपूर प्याच येथे पाण्याची टाकी, वाढीव पाईप लाईन, सह हात पंप भूमिपूजन, रामपूर चेक येथे जनसुविधा योजने अंतर्गत नाली बांधकाम, सह शोष खड्डे बांधकामाचं भूमिपूजन, शिवणीपाठ येथे रोड सह हात पंप भूमिपूजन सह इतर कामांचे भूमिपूजन करण्यात आले . याबाबत गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
भूमिपूजन कार्यक्रमाला बोरी नागेपल्ली चे माजी ज़िल्हा परिषद सदस्य सुनिताताई कुसनाके, माजी पंचायत समिती सदस्य छायाताई पोरतेट, बोरी ग्रामपंचायत चे सरपंच, शंकर कोडापे, उपसरपंच परागजी ओलालवार, राजपूर ग्रामपंचायत चे सरपंच मीनाताई वेलादी, ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुरेशजी गंगाधरीवार, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य मधुकर वेलादी, सामाजिक कार्यकर्ते नितीनजी गुंडावार, ग्रामपंचायत उपसरपंच कोकिरवार मॅडम, ग्रामपंचायत सदस्य संतोष पंदीलवार, बंडूभाऊ तलांडे, पांडुरंग रामटेके, मुरलीधर जी कोडशेपवार, मारोती पुल्लीवार, दिवाकर चाटारे, पेंटूजी अलोणे, प्रवीण निकेसर, श्रीनिवास औनूरवार, ग्रामसेवक दर्रो, सुंदराबाई मडावी माजी ग्रामपंचायत सदस्य, मुकुंदा ठाकरे माजी ग्रामपंचायत सदस्य, विलासजी निकसर पोलिस पाटील, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, राकेश सडमेक व गावातील नागरीक उपस्थित होते.
#The GAdvishva #Ajay Kankadalwar #Aheri #Gadchiroli