– न्यू स्टार व्हॉलीबॉल मंडळ देवलमारी च्या वतीने स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी, २५ डिसेंबर : तालुक्यातील देवलमारी ग्रामपंचायत येथे न्यू स्टार व्हॉलीबॉल मंडळ देवलमारीच्या वतीने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी आमदार दीपक दादा आत्राम व तिसरा पारितोषिक ग्रामपंचायत देवलमारी असे तीन पुरस्कार या स्पर्धेच्या विजेता संघाला देण्यात येणार आहे.
उदघाटन प्रसंगी मंचावर सारपंच लक्ष्मण कनाके, उपसरपंच हरीश गावळे, सदस्य महेश लेकूर, सदस्य लक्ष्मण आत्राम, सदस्य सलय्या कंबलवार, सदस्या विमला कुर्री, सदस्या शशिकला मोहंदा, सदस्या संजूबाई आत्राम, सदस्य रीमा मडावी, सदस्या मोनिका तोकला, माजी सरपंच पेंटूबाई पोरतेट, माजी उपसरपंच सुरेश गुंडावार, विनोद वरगटीवार, प्रभाकर वरगनटीवार, सुरेश तोकला, सभय्या तोकला, विनोद रामटेके व गावातील महिला पुरुष तसेच मंडळाचे अध्यक्ष रमेश तोकला, उपाध्यक्ष सुधाकर लेकूर, सचिव गणेश गदासवार, सहसचिव सुधीर भामनकर, कोषाध्यक्ष संजय गोंडे खेळाडू उपस्थित होते.
