छल्लेवाडा येथे जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते जलकुंभाचे भूमिपूजन

334

– छल्लेवाडा येथील नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचे पाणी
The गडविश्व
अहेरी, २६ नोव्हेंबर : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय रेपनपली अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याचे पाण्याची विहीर व जलकुंभ मंजूर करण्यात आले. सदर विहीर व जलकुंभाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
छल्लेवाडा येथे गाव निर्मितीपासून जलकुंभ उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळत नव्हते. मात्र जि.प.अध्यक्ष यांच्या कडे नवीन विहीर व जलकुंभ साठी मागणी केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागातून निधी मंजूर करण्यात आले. जलकुंभ व विहीर बांधकाम करण्यात येणार असल्याने प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर, अँड.एच.के.आकदर, विलास बोरकर, गुलाब देवगडे, शंकर बासरकर, लक्ष्मण झाडे, राहुल सुंदिला, अशोक झाडे, वागू निमगडे, लक्ष्मण जनगाम, मनोहर बासरकर, रवि दुर्गे, वैकुंटम आकुदारी, नागेश ताटिपेली, महेश भगत, हनमंतू ठाकरे, प्रशांत गुरनूले, श्रीनिवास लेंडगुरे, मोंडी कोटरंगे, स्वामी ठाकरे, वसंत चव्हाण, विलास सिडाम, वासुदेव सिडाम, सुरेश ठाकरे, किष्टाया गुरनूले, नारायण कोटरंगे, श्रीहरी गुरजाला, रवि चव्हाण, रवि सोतकु, रजित सभावा, सुरेश चव्हाण तसेच परिसरातील पुरुष-महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

#The Gadvishva #Gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here